मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा 'जगातील सर्वात उंच'

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : 100 फूट उंचीच्या पुतळ्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; 48 कोटी खर्चून उभारणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा 'जगातील सर्वात उंच'

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : 100 फूट उंचीच्या पुतळ्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; 48 कोटी खर्चून उभारणी

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडजवळील मोशी येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या या 100 फूट उंच पुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj Statue

ऐतिहासिक मानवंदना

या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने 'स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण'ला अनोखी मानवंदना देण्यात आली. तब्बल तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे ध्वजांच्या गजरात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात मानवंदना दिली. यावेळी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले, तर चिखली येथील संतपीठाने कीर्तन सादर केले. बाल शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलेल्या शिवगीतांवर शिवभक्तांनी ठेका धरला होता.

पुतळ्याची वैशिष्ट्ये

मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र परिसरात उभारण्यात येत असलेला हा पुतळा ब्राँझ धातूपासून तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची तब्बल 100 फूट आहे आणि त्याच्या उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 48 कोटी रुपये खर्च करत आहे. याच परिसरात शंभू सृष्टी देखील साकारली जात आहे.

शेअर करा