मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआरवरून महायुतीत पहिली ठिणगी; छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

Chhagan Bhujbal On Maharashtra Sarkar : 'कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क नाही,' भुजबळांचा सरकारला थेट विरोध

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआरवरून महायुतीत पहिली ठिणगी; छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

Chhagan Bhujbal On Maharashtra Sarkar : 'कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क नाही,' भुजबळांचा सरकारला थेट विरोध

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी 'हैदराबाद गॅझेटियर' लागू करण्याच्या राज्य सरकारच्या शासन आदेशावरून (GR) महायुती सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी छगन भुजबळ यांनी या जीआरला तीव्र विरोध करत आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. प्री-कॅबिनेट बैठकीनंतर ते मंत्रिमंडळ बैठकीला न जाता थेट सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले.

भुजबळ यांची आक्रमक भूमिका

छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "काल सरकारने जो जीआर काढला आहे, त्याबद्दल ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठ्या शंका आहेत. आम्ही या जीआरचा नेमका अर्थ काय आहे, याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क कुठल्याही सरकारला नाही. जात बदलता येत नाही." भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला.

तसेच, "काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या. उपसमितीला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, हा देखील प्रश्न विचारला जात आहे," असे सांगत त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकार असा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आपल्याला नव्हती, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

ओबीसी नेत्यांचा भुजबळांना पाठिंबा
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेचे स्वागत केले. "आम्ही सर्व ओबीसी नेते आक्रमकपणे याला विरोध करणार आहोत. 'सगेसोयरे' शब्दाची पुनरावृत्ती आम्हाला कालच्या जीआरमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची फसवणूक झाली आहे," असे शेंडगे म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी असाच जीआर काढला होता, तेव्हा ओबीसी समाजाने 8 लाख हरकती नोंदवून तो रद्द करायला लावला होता.

शेअर करा