मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chhagan Bhujbal : "अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपद देऊ केले होते," भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : कोकाटे प्रकरणात कृषी खाते चर्चेत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chhagan Bhujbal : "अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपद देऊ केले होते," भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : कोकाटे प्रकरणात कृषी खाते चर्चेत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा दावा

नाशिक | विधिमंडळात 'रमी' खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal  यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कृषिमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला होता, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

नाशिक येथे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "आम्ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालो, तेव्हा अजितदादांनी अर्थ खाते घेतले. त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर अनेक खाती ठेवली आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी मला कृषी खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला होता." मात्र, आपण हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

"मी अजित पवारांना सांगितले की, माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर नेहमीच उभे असतो, पण त्याची बारीकसारीक माहिती ग्रामीण भागातील लोकांना असते. त्यामुळे हे खाते ग्रामीण भागातील व्यक्तीलाच द्यावे," असे भुजबळ यांनी सांगितले. आता नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे या पदाला योग्य न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भरणे ग्रामीण भागातून असल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अधिक चांगली जाण ठेवतात, असे भुजबळ यांनी म्हटले.

शेअर करा