मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

शिरगांवजवळ कार अपघातात १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे घडली घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे घडली घटना

पुणे, एप्रिल १०, महाराष्ट्र मिरर: चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारने पुढच्या वाहनाला आणि दुभाजकाला धडक दिल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (८ एप्रिल) रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई हायवेवर शिरगाव हद्दीत घडला.

याप्रकरणी अश्वेश राजेश सावंत (३२, विरार वेस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य उदय शहा (३०, विटा, जि. सांगली) या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दर्शन अभिजित शहा (१५, कडेगाव, जि. सांगली) या मुलाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आपली कार (एमएच १०/ ईके ३६५१) वेगाने घेऊन जात असताना त्याचे रस्त्यावरील लक्ष विचलित झाले आणि कारने समोरच्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कार उजव्या बाजूच्या दुभाजकाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात दर्शन याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी आणि आरोपी देखील जखमी झाले आहेत. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा