मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेत केली आत्महत्या; ‘साप चावला’ अशी ओरड करून टॅक्सीतून उतरला

Worli Bandra Sea Link Suicide News : मृत्यूचे कारण अस्पष्ट; आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

V
Vivek

1 मिनिट वाचन

व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेत केली आत्महत्या; ‘साप चावला’ अशी ओरड करून टॅक्सीतून उतरला

Worli Bandra Sea Link Suicide News : मृत्यूचे कारण अस्पष्ट; आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

मुंबई :- मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून Bandra Worli Sea Link समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, व्यावसायिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अमित शांतीलाल चोप्रा (47 वय) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री ते एका टॅक्सीने प्रवास करत होते. त्यांची टॅक्सी सी लिंकवर येताच, त्यांनी अचानक "आपल्याला साप चावला" असा आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने गाडी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडून थेट सी लिंकवरून समुद्रात उडी मारली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित चोप्रा यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढून ताब्यात घेतला. पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली

अमित चोप्रा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून, मुंबईतील अंधेरी येथे ते पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. पोलिसांनी आता या आत्महत्येचा तपास सुरू केला असून, आर्थिक अडचणी किंवा इतर काही समस्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले का, याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शेअर करा