मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

इंदापुरात १० लाखांची घरफोडी

घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड लंपास

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

इंदापुरात १० लाखांची घरफोडी

घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड लंपास

पुणे: इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील चितळकरवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख ७१ हजार रुपयांचा मोठा ऐवज लंपास केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घरफोडीत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अक्षय दिलखुश चितळकर (वय २८, व्यवसाय ट्रान्स्फॉर्मर रिपेअरिंग, रा. चितळकरवाडी, वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कपाट उचकटून डल्ला मारला
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ३) मध्यरात्री एक ते पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील खोलीत असलेले लाकडी कपाट चोरट्याने शिताफीने उचकटले. त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

व्यावसायिकाच्या घरात चोरी
फिर्यादी अक्षय चितळकर हे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचा व्यवसाय करतात. पहाटेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. भरवस्तीत असलेल्या घराचे कुलूप तोडून लाखांचा ऐवजी लंपास झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

इंदापूर पोलीस या घटनेचा तांत्रिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक बिरादार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा