मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bribe News : जळगावात लाचखोरावर ला.प्र.वि.चा घणाघात! १५ हजारांच्या नोटांवर गडगडला भ्रष्ट अधिकारी

जळगाव | “पैसा दे – फाईल घे” अशी उघड मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने रंगेहात पकडले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Beed Bribe News

जळगाव | “पैसा दे – फाईल घे” अशी उघड मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने रंगेहात पकडले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांनी एका हॉस्पिटलच्या बायोवेस्ट प्रमाणपत्रासाठी दाखल अर्ज मागे घेण्यासाठी १५,००० रुपयांची जिवंत लाच मागितल्याचा घिनौना प्रकार उघड झाला. Jalgaon Bribe News

लाचखोराचा खेळ आणि सापळ्याची चमक

रावेरमधील हॉस्पिटलच्या अर्जात मुद्दाम त्रुटी काढत सुर्यवंशी यांनी “१५ हजार द्या, अर्ज रिजेक्ट करतो” असा उघड बाजार उघडला.

तक्रारदाराने “रुपया नाही, सापळा होईल” असा निर्णय घेत ला.प्र.वि. जळगावकडे धाव घेतली.

ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर २०२५ रोजी खाजगी इसम मनोज बापू गजरे याच्या मार्फत लाच रक्कम स्वीकारण्याचा प्लॅन आखला गेला.

ला.प्र.वि.च्या पथकाने जबरदस्त तयारी करून १५,००० रुपयांच्या नोटांवर सापळा लावला आणि गजरेला नोटा हाती देताना रंगेहात पकडले, तर मुख्य सूत्रधार सुर्यवंशीला तात्काळ बेड्या ठोकल्या.

गुन्हा दाखल

जळगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७९/२०२५
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७, ७(अ) व १२ अंतर्गत गुन्हा नोंद.

ला.प्र.वि.च्या तडाख्याची टीम

ही धडाकेबाज कारवाई भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली,
पर्यवेक्षण अधिकारी उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, तसेच पोना बाळ मराठे आणि पोशि भूषण पाटील यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण पार पाडली.

कडक संदेश

ला.प्र.वि.च्या या धडाकेबाज कारवाईने पुन्हा एकदा स्पष्ट केले की –

“लाचखोरीचे राज्य संपवण्याचा चमत्कार नोटांच्या रंगाने नाही तर कायद्याच्या तडाख्यानेच होतो!”

शेअर करा