मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : बालभारतीच्या पुस्तकांच्या दरात १० टक्के वाढ

सहावीची पुस्तके २० जून नंतर मिळण्याची शक्यता

M
mubarak

1 मिनिट वाचन

books price increase
books price increase

सहावीची पुस्तके २० जून नंतर मिळण्याची शक्यता

पुणे, महाराष्ट्र मिरर, प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार असून सहावीची काही पुस्तके १५ ते २० जून नंतरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.

यंदा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाळा सुरू होताच अभ्यासक्रम बदललेल्या वर्गांतील विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात ‘ब्रिज कोर्स’च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

अध्ययन निष्पत्ती लक्षात घेऊन पुस्तकांच्या रचनेत बदल
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या संकल्पनेवर आधारित सुधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. अध्ययन निष्पत्ती लक्षात घेऊन पुस्तकांच्या रचनेत बदल करण्यात आला असून विद्यार्थीकेंद्रित आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

गणित विषयात जादुई गणित, गणितीय कोडी आणि कृतीआधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान विषयात परिसर अभ्यासावर भर देण्यात आला असून भूगोलाच्या पुस्तकांमध्ये संबंधित जिल्ह्यांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. मराठी विषयात मालवणी आणि वऱ्हाडी बोलीभाषेचा समावेश करून भाषिक वैविध्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

बदल नसलेली नियमित पुस्तके उपलब्ध
अभ्यासक्रमात बदल नसलेली नियमित पुस्तके शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी उपलब्ध होणार आहेत. मात्र बदललेल्या पुस्तकांची विक्री आठवडाभराने सुरू होईल. सहावीच्या काही पुस्तकांसाठी विद्यार्थी आणि पालकांना १५ ते २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी सांगितले की, "बालभारतीच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन दर्जेदार पुस्तके तयार करण्यात आली असून लवकरच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचतील."

10% increase in the price of children's books in India

शेअर करा