मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bollywood Drug Party : बॉलिवूड आणि राजकारण्यांसाठी 'ड्रग्ज पार्टी'! दुबईतून आणलेल्या सूत्रधाराचा चौकशीत धक्कादायक खुलासा

Bollywood Drugs Party Latest News : 250 कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणात मोठी माहिती; अनेक दिग्गज सेलिब्रेटी पोलिसांच्या रडारवर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombivli's Drug Lord

Bollywood Drugs Party Latest News : 250 कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणात मोठी माहिती; अनेक दिग्गज सेलिब्रेटी पोलिसांच्या रडारवर

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अमली पदार्थविरोधी पथकाने (ANC) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) प्रत्यार्पण करून आणलेला कुख्यात अमली पदार्थांचा सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याने चौकशीत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. सलीम शेख याने हिंदी सिनेसृष्टीतील (बॉलिवूड) प्रसिद्ध कलावंत आणि राजकीय व्यक्तींसाठी अमली पदार्थांच्या मेजवान्या आयोजित केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यामुळे अनेक दिग्गज कलाकार आणि नेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत. Mumbai Latest Crime News

250 कोटींच्या प्रकरणाचा सूत्रधार

सलीम शेख हा यूएईमध्ये राहून भारतात अमली पदार्थांचे मोठे व्यवहार चालवत होता. सुमारे 250 कोटी रुपयांचे हे संपूर्ण प्रकरण एका महिलेच्या अटकेनंतर समोर आले. फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन (एमडी) सह अटक केली होती. या तपासामध्ये सलीम शेख हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. तो महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्रॉनचे उत्पादन आणि पुरवठा करत होता.

सेलिब्रेटी आणि राजकारण्यांसाठी आलिशान मेजवान्या

आरोपी मोहम्मद सुहेल शेख याने पोलीस चौकशीत कबूल केले की, त्याने मुंबई, गोवा तसेच दुबई येथे हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी आलिशान 'ड्रग्ज' मेजवान्या आयोजित केल्या होत्या. या मेजवान्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असे.

सलीमने नाव घेतलेले राजकारणी आणि सेलिब्रेटी आता पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस या व्यक्तींचे अन्य तस्करांशी संबंध आहेत का, त्यांनी यापूर्वी आयोजित मेजवान्यांमध्ये सहभाग घेतला आहे का, तसेच या खर्चिक मेजवान्यांसाठीच्या पैशाचा स्रोत काय होता, याचा तपास करत आहेत. अमली पदार्थांचे हे जाळे आता थेट उच्चभ्रू वर्गापर्यंत पोहोचल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 15 जणांना अटक केली आहे.

शेअर करा