मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bollywood Breaking News : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा वादात; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, मुंबईतील व्यावसायिकाची तक्रार

Bollywood Breaking News : 'बेस्ट डील टीव्ही'मध्ये 60 कोटींची गुंतवणूक वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा दावा; जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bollywood Breaking News : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा वादात; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, मुंबईतील व्यावसायिकाची तक्रार

Bollywood Breaking News : 'बेस्ट डील टीव्ही'मध्ये 60 कोटींची गुंतवणूक वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा दावा; जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा Raj Kundra यांच्यावर एका मुंबईस्थित व्यावसायिकाने तब्बल 60.48 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

व्यवसायी दीपक कोठारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2015 ते 2016 या कालावधीत शिल्पा-राज यांच्या 'बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी 60.48 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, ही रक्कम कंपनीच्या कामकाजासाठी न वापरता, ती वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आल्याचा दावा कोठारी यांनी केला आहे.

तक्रारीत कोठारी यांनी म्हटले आहे की, 2015 मध्ये ते एजंट राजेश आर्य यांच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संपर्कात आले होते. त्यावेळी शिल्पा शेट्टी कंपनीच्या संचालक होत्या आणि त्यांच्याकडे कंपनीचे 87 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. सुरुवातीला त्यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु नंतर ती रक्कम गुंतवणूक म्हणून देण्याचा निर्णय घेतला.

कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये 31.15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आणि त्यानंतर जानेवारी 2016 ते मार्च 2016 दरम्यान 28.54 कोटी रुपये दिले. तसेच, 3.19 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले. एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टी यांनी स्वतः वैयक्तिक हमीपत्र दिले होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच सप्टेंबर 2016 मध्ये त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. कोठारी यांना कोणतीही कल्पना नसताना, लवकरच कंपनीविरुद्ध 1.28 कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला दाखल झाला. वारंवार मागणी करूनही गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर कोठारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या आरोपांवर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

शेअर करा