मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

शहरातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानाचा निर्णय

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

शहरातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानाचा निर्णय

निलेश राऊत
पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याबराबेरच बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या, त्याखाली क्षेत्र, झोपडीधारकांची संख्या, त्यांचे निश्चित ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सध्या ५५७ झोपडपट्ट्या आहेत. मात्र, २०११ आणि २०१७ मध्ये राज्य शासनाने महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश केला. त्यामुळे पुणे महापालिकेबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीतदेखील वाढ झाली आहे. या वाढीव हद्दीसह दोन्ही शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पामध्ये झोपडपट्ट्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच प्रत्येक झोपडीला स्वतंत्र नंबर देण्यात येणार आहे. तर झोपडीतील रहिवाशांचे देखील बायोमेट्रिक ठसे आणि फोटो घेतले जाणार आहेत. त्याचबरोबरच त्यांच्या कागदपत्रांची देखील माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय झोपडपट्टीची हद्द निश्चित करणे, त्यांचे लोकेशन, त्या खालील क्षेत्राबरोबरच झोपडीधारकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पुनर्वसन योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे न्युज

शेअर करा