मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bihar Election Update : बिहारमध्ये NDA चा ऐतिहासिक विजय! 200 हून अधिक जागांवर आघाडी; भाजप, जदयू, लोजपाची निर्णायक कामगिरी

Bihar Election Latest News : नितीश कुमारांनी मानले मोदींसह सर्व पक्षांचे आभार; 'घुसखोरांच्या समर्थकां'विरुद्धच्या धोरणाचा विजय: अमित शहा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bihar Election Update : बिहारमध्ये NDA चा ऐतिहासिक विजय! 200 हून अधिक जागांवर आघाडी; भाजप, जदयू, लोजपाची निर्णायक कामगिरी

Bihar Election Latest News : नितीश कुमारांनी मानले मोदींसह सर्व पक्षांचे आभार; 'घुसखोरांच्या समर्थकां'विरुद्धच्या धोरणाचा विजय: अमित शहा

ANI :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election 2025) सत्ताधारी एनडीए (NDA) आघाडीने विरोधी महागठबंधनचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात एनडीएने 200 हून अधिक जागांवर निर्णायक आघाडी घेतली असून, तर महागठबंधन अंदाजे 35 जागांवर पिछाडीवर आहे. Bihar Election Latest News

निकालांचे कल स्पष्ट होताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील सर्व सहकारी पक्षांचे आणि बिहारच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार आणि एनडीएच्या इतर नेत्यांचे अभिनंदन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे निकाल म्हणजे, "भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे."

सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 127 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपला 61, जदयूला 41 तर लोजपाला 8 जागांवर विजय मिळाला आहे. कल आणि विजय दोन्ही मिळून भाजप 90, जदयू 84 आणि लोजपा 19 जागांवर पुढे आहेत. तर राजद 25 आणि काँग्रेस 6 जागांवर मागे आहेत. नितीशकुमार यांच्या जदयू आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये ही मुख्य लढत होती. या निवडणुकीत राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. एनडीएच्या या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये आता सरकार स्थापनेच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

शेअर करा