मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Police News : सराईत गुन्हेगारांचे 'गँग' जेरबंद! भिवंडी पोलिसांनी घरफोडी व मोबाईल चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले

Bhiwandi Police Latest News : नारपोली, शांतीनगर, निजामपूरा आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यांतील 9 गुन्ह्यांची यशस्वी उकल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Police News : सराईत गुन्हेगारांचे 'गँग' जेरबंद! भिवंडी पोलिसांनी घरफोडी व मोबाईल चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले

Bhiwandi Police Latest News : नारपोली, शांतीनगर, निजामपूरा आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यांतील 9 गुन्ह्यांची यशस्वी उकल

भिवंडी :- परिमंडळ-2 भिवंडी येथील घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत पोलिसांनी 5 सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून एकूण 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. Bhiwandi Police Latest News

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना या तपास कार्यात मोठे यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जुनेद अहमद शहा (20 वय), मोहम्मद आकीब आन (22 वय), हमजा सिद्धीकी (20 वय), शाहरूख अन्सारी (21 वय) (सर्व रा. भिवंडी) आणि शाकीर साजिद शेख (22 वय, रा. गोवंडी, मुंबई) यांचा समावेश आहे. यावरून या गुन्ह्यांचे धागेदोरे मुंबईपर्यंत जोडले गेले असल्याचे स्पष्ट होते. Bhiwandi Latest Mobile Robbery News

3.12 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख 12 हजार 423 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालामध्ये 2 दुचाकी स्कुटर, 7 मोबाईल फोन, 4 टायरचे बंडल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.

या आरोपींकडून नारपोली, शांतीनगर, निजामपुरा आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यांत दाखल असलेले घरफोडी, चोरी आणि इतर मालमत्ता चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या यशामुळे भिवंडी परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे.

शेअर करा