मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bharat Sheth Gogawale : महायुतीत पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; रायगडमध्ये तटकरेंना मान मिळाल्याने गोगावले नाराज?

Bharat Sheth Gogawale Latest News : ध्वजारोहणावरून 'नाराजीनाट्य', गोगावले कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bharat Sheth Gogawale : महायुतीत पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; रायगडमध्ये तटकरेंना मान मिळाल्याने गोगावले नाराज?

Bharat Sheth Gogawale Latest News : ध्वजारोहणावरून 'नाराजीनाट्य', गोगावले कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

मुंबई :- स्वातंत्र्यदिनासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या ध्वजारोहण यादीने महायुतीमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा समोर आणली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि मंत्री भरत गोगावले नाराज झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या नाराजीमुळेच गोगावले आजच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे यंदा 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी गोगावले यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, शासनाने सोमवारी जाहीर केलेल्या यादीत तटकरे यांचे नाव असल्यामुळे गोगावले यांच्यासह रायगडमधील शिवसैनिक नाराज झाले आहेत.

गोगावले यांच्या अनुपस्थितीमागे नाराजी?

मुंबईबाहेर असून आज कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. मात्र, राजकीय वर्तुळात कौटुंबिक कारण सांगितले जात असले तरी, ध्वजारोहणाच्या मानपानावरूनच ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यातही संघर्ष आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. या वादावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 'ही पालकमंत्रीपदाची यादी नसून फक्त ध्वजारोहणाची यादी आहे,' असे सामंत यांनी स्पष्ट केले, तर 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य आहे,' असे दादा भुसे म्हणाले. मात्र, या नाराजीनाट्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद उघड झाले आहेत.

शेअर करा