मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

•सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत शोरुममधील सर्व सामान जळून खाक, जीवितहानी नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

•सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत शोरुममधील सर्व सामान जळून खाक, जीवितहानी नाही

मुंबई :- चेंबूर येथील मल्हार हॉटेलजवळ असलेल्या शीव आशिष इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बाटाच्या शोरूमला सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील चपला, बूट आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे ती तळघरापर्यंत पसरली होती. अग्निशमन दलाने या आगीला 'भीषण' (वर्दी क्रमांक 1) घोषित केले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. आगीमुळे शोरूममधील विद्युत यंत्रणा, वायरिंग, चप्पल-बूटांचे बॉक्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

आगीच्या कारणांचा अद्याप शोध सुरू असून, सध्या घटनास्थळी 'कुलिंग ऑपरेशन' सुरू आहे. अग्निशमन दलासोबतच अदानी इलेक्ट्रिसिटी, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा: Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचे पुनरागमन; बुधवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

शेअर करा