मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचे पुनरागमन; बुधवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

•कोकण आणि विदर्भात 'यलो अलर्ट', रत्नागिरी-सिंधुदुर्गात 14 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nagpur Rain Update : नागपुरात मुसळधार पावसाचा कहर! शाळांना सुट्टीचा आदेश

•कोकण आणि विदर्भात 'यलो अलर्ट', रत्नागिरी-सिंधुदुर्गात 14 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवार, 13 ऑगस्टपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 12 ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 14 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'

विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Kalyan Traffic Jam : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसेचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

शेअर करा