मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Baramati Crime News : बारामती तलाठी कार्यालयात पाच हजाराची लाच स्वीकारणारा तो व्यक्ती झाला गजाआड

• लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई ; बारामती तलाठी कार्यालयात मागितली लाच, वारसा नोंद करण्याकरिता तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीकडून पाच हजाराची ..

V
Vivek

1 मिनिट वाचन

Beed Crime News

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई ; बारामती तलाठी कार्यालयात मागितली लाच, वारसा नोंद करण्याकरिता तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीकडून पाच हजाराची..

पुणे :- वारसनोंद करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बारामतीत शुक्रवारी (17 मे) पकडले.चंद्रकांत परबत जावळकर (50 वर्ष, रा. बारामती) याने वारसनोंद करून देण्यासाठी तलाठ्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यापैकी तीन हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ त्याला ताब्यात घेतले.

तक्रारदाराच्या सासऱ्याच्या नावावरील कसबा येथील जागेवर तक्रारदाराच्या पत्नीची वारस म्हणून नोंद लावण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद लावण्यासाठी खाजगी इसम चंद्रकांत जावळकर याने तलाठ्याच्या करिता पाच हजार रुपयांची लाच मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली, तेव्हा खाजगी एजंट चंद्रकांत जावळकर याने बारामतीच्या तलाठ्यासाठी तक्रारदाराकडे पत्नीची वारस नोंद करण्यासाठी पंचायत समक्ष तडजोड करून चार हजार रुपयांची लाच मागितली आणि तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच घेताना चंद्रकांत जावळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा: Panvel Express Accident : उभ्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून येणार्‍या ट्रेलरची धडक ; 2 जखमी

शेअर करा