मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

Balasaheb Thackeray Jayanti 2025 : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

Balasaheb Thackeray Jayanti 2025 : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने बीकेसी मैदानावर कार्यक्रम होणार आहे.

मुंबई :- दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला शिवसेना दोन्ही पक्ष महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे Shinde group यांच्या शिवसेनेने बीकेसी मैदानावर आपला कार्यक्रम आयोजित केला आहे, तर दुसरीकडे अंधेरी पश्चिम येथे उद्धव ठाकरेंची Thackeray Group सभा होणार आहे.शिवसेना खरी आणि खोटी सिद्ध करण्यासाठी हे दोघेही सभांमध्ये एकमेकांवर हल्लाबोल करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत शिवसेनेचे 7 खासदार तर विधानसभेत शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 15 लाख 63 हजार 917 मते जास्त मिळाली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे एकनाथ शिंदे व निवडून आलेल्या सर्व आमदार व खासदारांचे शिवसैनिक व राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने भव्य नागरी स्वागत करण्यात येणार आहे.एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात सोनू निगमचा शो होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण होईल. प्रत्येक आमदाराला आपापल्या भागातील कार्यकर्त्यांसह कार्यक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे.

अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोडवर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.गेल्या 24 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे समीकरण वेगळे असले तरी यावेळी ठाकरेंना सत्ता मिळवणे कठीण झाले आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे दोन्ही मेळावे पहिल्यांदाच होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. आता ठाकरेंची नजर मुंबई महापालिकेवर आहे, त्यामुळे मुंबईबाबत ठाकरे भाजप आणि शिंदे यांना टार्गेट करणार आहेत.

शेअर करा