मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uttrakhand News : बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता ; सहा जणांचा शोध सुरू

Uttrakhand News :उत्तराखंड : जोशीमठ परिसरात बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणारे ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता; जोशीमठजवळ दुर्घटनेची शक्यता, सहा जणांचा शोध सुरू
बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता; जोशीमठजवळ दुर्घटनेची शक्यता, सहा जणांचा शोध सुरू

Uttrakhand News :उत्तराखंड : जोशीमठ परिसरात बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणारे ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टर चाई गावाजवळील डोंगराळ भागात कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अद्याप त्याचे अवशेष सापडलेले नाहीत. घटनेनंतर पोलीस, एसडीआरएफ, लष्कर आणि आयटीबीपीच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Uttrakhand News

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून देहरादूनमधील सहस्रधारा हेलिपॅडकडे रवाना झाले होते. उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांनी हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) आणि रेडिओ संपर्क तुटला. त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून हेलिकॉप्टरशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Uttrakhand News

हेलिकॉप्टरचे शेवटचे लोकेशन जोशीमठमधील चाई गावाजवळ नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. या परिसरातील डोंगराला धडकून हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, लष्कर आणि आयटीबीपीची पथके शोध व बचावकार्यासाठी रवाना झाली. एसडीआरएफ आणि पोलीस पथकांकडून दुर्गम डोंगराळ भागात शोधमोहीम सुरू असून, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह (एसडीएम) बचाव पथकही घटनास्थळी दाखल होत आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट हिमांशू यांच्यासह पाच प्रवासी होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

प्रथापा
अरुण सालुंके
शंकरगौडा व्ही. जी.
सुधीर के.
एच. एस. नागाराजा
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफच्या संयुक्त पथकांकडून बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गंभीर जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी आणि पायलट सुखरूप असावेत, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध सुरू असून, बचाव पथकांचे लक्ष चाई गावाजवळील दुर्गम डोंगराळ भागावर केंद्रित झाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा