मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Badlapur Sex Racket : बदलापूरमध्ये वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश! हॉटेलवर धाड टाकून 1 दलाल महिला अटक, 2 पीडित मुलींची सुटका

Badlapur Sex Racket Busted News : अनौतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई; 'हॉटेल आराधना' परिसरातून महिला आरोपीला अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Police Raids in Nalasopara'

Badlapur Sex Racket Busted News : अनौतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई; 'हॉटेल आराधना' परिसरातून महिला आरोपीला अटक

बदलापूर,ठाणे :- बदलापूर पश्चिम परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अत्यंत धडक कारवाई करत वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिला दलालाला रंगेहात अटक केली आहे. Badlapur Sex Racket News हॉटेलवर सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन असहाय्य पीडित मुलींना माणुसकीच्या तस्करांच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. Badlapur Latest Crime News

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना 18 नोव्हेंबर 2025 रोजी या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली. स्टेशन रोड, बदलापूर पश्चिम येथील हॉटेल आराधना येथे एक दलाल महिला असहाय्य मुलींना फुस लावून वेश्यागमनासाठी बोलवणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या दलाल महिलेला ताब्यात घेतले. तिच्या देखरेखीखाली असलेल्या दोन पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. आरोपी महिला दलालावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मानवी तस्करीचा कट यशस्वीरीत्या उधळण्यात आला.

शेअर करा