मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Badlapur Crime News : 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून 12 लाखांची खंडणी; बदलापूर पोलिसांकडून 3 आरोपींना अटक

Badlapur Latest Crime News : गुजरातमध्ये गणपती दर्शनादरम्यान झाली घटना; पोलिसांनी 4 दिवसांत सुटका करून मुलाला आईकडे परत आणले

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Crime News: 15-year-old girl commits suicide after being unable to bear the stress of studies; ends life by jumping from the 31st floor

Badlapur Latest Crime News : गुजरातमध्ये गणपती दर्शनादरम्यान झाली घटना; पोलिसांनी 4 दिवसांत सुटका करून मुलाला आईकडे परत आणले

बदलापूर :- गणेशोत्सवासाठी गुजरातमध्ये वडिलांच्या गावी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे त्याच्याच ओळखीच्या लोकांनी अपहरण करून त्याच्या आईकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत, चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तीन आरोपींना अटक केली आणि मुलाला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Badlapur Latest Crime News

गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण

वांगणी येथील एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 31 सप्टेंबर रोजी गुजरातमधील वडिलांच्या गावी (मडोसा) गणेशोत्सव पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना भेटून गणपती दर्शनासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेऊन आरोपींनी त्याला एका चारचाकी गाडीतून जंगलात पळवून नेले आणि डांबून ठेवले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या आईला फोन करून त्याच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची खंडणी मागितली.

पोलिसांनी धाडली दोन पथके

घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तात्काळ दोन पथके गुजरातला रवाना केली.

पोलिसांनी तपास सुरू केल्याची कुणकुण लागताच आरोपी घाबरले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुलाला एका बस थांब्यावर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांचा तांत्रिक तपास सुरूच होता. या तपासणीतून पोलिसांनी मडोसा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण खैर, नरेश खैर आणि अनिल खैर या अन्य दोन आरोपींना राजस्थान सीमेजवळून अटक करण्यात आली.

मुलानेही दाखवले धाडस

आरोपींनी सोडल्यानंतर पुन्हा पकडले जाण्याच्या भीतीने मुलाने आपला मोबाईल बंद केला. त्याने कोणत्याही वाहनाची मदत न घेता धाडसाने पायी चालत चाळीसगाव येथील आपल्या मामाचे गाव गाठले. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक मदतीने तीन दिवसांनंतर त्याला चाळीसगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले आणि बदलापूर येथे त्याच्या आईकडे परत आणले.

केवळ पैशांच्या हव्यासापोटी हे कृत्य करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सांगितले. या यशस्वी तपासात पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम, अनंता पाटील, कनोजे, परमार आणि काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे मुलाला पुन्हा त्याचे कुटुंब मिळाले आहे.

शेअर करा