Japan News : पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताला कांस्य
Japan News : टोकियो : भारताने पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये ३ मिनिटे ०१.६१ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले.
1 मिनिट वाचन

Japan News : टोकियो : भारताने पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये ३ मिनिटे ०१.६१ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. जपान आणि कतारने भारतापेक्षा सरस कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले. भारताकडून धर्मवीर चौधरी, मनू टी., जय कुमार आणि विशाल टीके या भारतीय चौकडीने चांगली कामगिरी केली. मनू आणि विशाल यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या लेगमध्ये दमदार कामगिरी केली. जपानने ३ मिनिटे ००.७५ सेकंदांसह सुवर्ण, तर कतारने ३ मिनिटे ००.९३ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील गतविजेत्या भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे महिलांच्या रिलेनंतर पुरुषांच्या रिलेतही सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले.https://maharashtramirror.com/ Japan News




