मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dharashiv News : राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचे टोकाचे पाऊल; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

Dharashiv News : धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचे टोकाचे पाऊल; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी एक मुलाचा जागीच मृत्यू; उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू, दुसरी मुलगी गंभीर
राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचे टोकाचे पाऊल; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी एक मुलाचा जागीच मृत्यू; उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू, दुसरी मुलगी गंभीर

Dharashiv News : एक मुलाचा जागीच मृत्यू; उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू, दुसरी मुलगी गंभीर

Dharashiv News : धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीरा नावाची दुसरी मुलगी गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Dharashiv News

‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून होती ओळख

अश्विनी पौळ यांची कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कारकीर्द होती. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई केली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे कुस्ती क्षेत्रात त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळख मिळाली होती. अशा यशस्वी खेळाडूने तीन मुलांसह उचललेल्या टोकाच्या पावलामुळे क्रीडा क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Dharashiv News

वडिलांकडून पती आणि सासरच्या मंडळींवर आरोप

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीला सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. https://maharashtramirror.com/ Dharashiv News

पोलिसांकडून तपास सुरू

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. अश्विनी पौळ यांनी नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घेतला, त्यामागे कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणते कारण होते का, तसेच त्यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेमुळे नळदुर्ग परिसरातही मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा