मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashok Kharat : भोंदू बाबा खरातच्या 'ईशान्येश्वर' मंदिराला सरकारी तिजोरीतून दीड कोटींचा बूस्टर! 2018 चा खळबळजनक 'जीआर' उघड

Ashok Kharat Latest News : भक्तांच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर डल्ला; तत्कालीन मंत्र्यांकडून निधीची खैरात आणि शिर्डीत अत्याचाराचा नवा गुन्हा!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Ashok Kharat : भोंदू बाबा खरातच्या 'ईशान्येश्वर' मंदिराला सरकारी तिजोरीतून दीड कोटींचा बूस्टर! 2018 चा खळबळजनक 'जीआर' उघड

Ashok Kharat Latest News :भक्तांच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर डल्ला; तत्कालीन मंत्र्यांकडून निधीची खैरात आणि शिर्डीत अत्याचाराचा नवा गुन्हा!

नाशिक/शिर्डी :- स्वतःला 'सिद्ध पुरुष' आणि 'अंकशास्त्रज्ञ' म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचे एकेक धक्कादायक पदर आता उलगडू लागले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या नराधमाला केवळ राजकीय वरदहस्तच नव्हता, तर चक्क सरकारी तिजोरीतूनही रग्गड निधी पुरवण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या 'श्री ईशान्येश्वर मंदिरा'साठी युती सरकारच्या काळात 2018 मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यासंदर्भातील 31 मार्च 2018 चा शासन निर्णय (GR) आता उघड झाला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात हा निधी मंजूर झाला होता. यातील 1.05 कोटींच्या मोठ्या आराखड्यातून 25 लाख रुपये तातडीने खर्च करून मंदिराचा सभामंडप, पेव्हर ब्लॉक, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम आणि भव्य भक्तनिवासाचे बांधकाम करण्यात आले होते. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः हे काम पूर्ण केले होते. मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर 'कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट' म्हणून मिरवणाऱ्या खरातच्या जाळ्यात अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक अडकले होते, ज्याचा फायदा घेत त्याने हा सरकारी निधी लाटल्याचे आता स्पष्ट होत आहे.

एकीकडे सरकारी पैशांची उधळपट्टी उघड होत असतानाच, खरातचा पाशवी चेहराही समोर आला आहे. नाशिक पाठोपाठ आता शिर्डीतही खरातविरुद्ध बलात्काराचा नवा गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान खरातने तिच्यावर तब्बल 4 वेळा बलात्कार केला. "शेतात घर बांधण्यासाठी जागा पाहणे" आणि "मुलीने कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा" यासारख्या कौटुंबिक मार्गदर्शनासाठी हे कुटुंब खरातकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने पीडितेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. "वाच्यता केली तर दैवी शक्तीने तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेन," अशी धमकी देऊन त्याने पीडितेचे तोंड बंद ठेवले होते.

अशोक खरात सध्या 29 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत असून, विशेष तपास पथक (SIT) त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि राजकीय संबंधांची कसून चौकशी करत आहे. 'सिद्ध पुरुषा'चा मुखवटा घालून वावरणाऱ्या या सैतानाने विळखा घातलेल्या इतर पीडितांनीही आता पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शेअर करा