मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Asha Gawali : 'डॅडी' 17 वर्षांनंतर घरी परतले; पत्नी आशा गवळी म्हणाल्या, 'किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला'

Asha Gawali On Arun Gawali : गँगस्टर अरुण गवळी तुरुंगातून बाहेर; कुटुंबासह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Asha Gawali : 'डॅडी' 17 वर्षांनंतर घरी परतले; पत्नी आशा गवळी म्हणाल्या, 'किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला'

Asha Gawali On Arun Gawali : गँगस्टर अरुण गवळी तुरुंगातून बाहेर; कुटुंबासह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई :- एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये ज्यांच्या नावाची दहशत होती, ते अरुण गवळी Arun Gawali तब्बल 17 वर्षांची शिक्षा भोगून अखेर घरी परतले आहेत. अरुण गवळी, ज्यांना 'डॅडी' या नावाने ओळखले जाते, त्यांच्या परतण्याने त्यांच्या पत्नी आशा गवळी आणि कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. आशा गवळी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

अरुण गवळींचे स्वागत करताना आशा गवळी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्या म्हणाल्या, "किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला… आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, कारण माझे पती देव डॅडी 17 वर्षांच्या त्यागानंतर आज स्वगृही परतले." हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिवार आणि चाहत्यांसाठी खूप खास असल्याचे त्यांनी सांगितले.

आशा गवळी यांनी पुढे म्हटले की, "इतकी वर्षे डॅडी आपल्या परिवारासोबत राहावे यासाठी संघर्ष करत होते. पण म्हणतात ना, 'भगवान के घर देर है, अंधेर नहीं'. त्यांनी जो संयम आणि सहनशीलता राखली आणि भगवंतावर विश्वास ठेवला, त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण द्विगुणित झाला."

अरुण गवळींनी भोगलेल्या दुःखाची कल्पना कोणीही करू शकत नाही, असे सांगत आशा गवळींनी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली. या आनंदात सोबत असलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. सध्या आशा गवळी यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

शेअर करा