मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मंत्रजपाच्या बहाण्याने ७० वर्षीय महिलेची फसवणूक; सोन्याचे दागिने घेऊन तरुणी फरार

Mumbai News : मुंबई : अँटॉप हिल परिसरात एका ७० वर्षीय महिलेची कथितपणे मंत्रजपाच्या बहाण्याने फसवणूक करून तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

मंत्रजपाच्या बहाण्याने ७० वर्षीय महिलेची फसवणूक; सोन्याचे दागिने घेऊन तरुणी फरार
मंत्रजपाच्या बहाण्याने ७० वर्षीय महिलेची फसवणूक; सोन्याचे दागिने घेऊन तरुणी फरार


Mumbai News : मुंबई :
अँटॉप हिल परिसरात एका ७० वर्षीय महिलेची कथितपणे मंत्रजपाच्या बहाण्याने फसवणूक करून तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी तरुणीने आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील दागिने घेऊन पोबारा केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली https://maharashtramirror.com/ Mumbai news

कुलसुमबी काझी (वय ७०) या अँटॉप हिल परिसरात कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी त्या दूध घेऊन घरी परतत असताना एका अनोळखी तरुणीने त्यांचा पाठलाग सुरू केला. कुलसुमबी यांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता ती काहीही न बोलता तेथून निघून गेली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

मात्र, काही वेळाने तीच तरुणी थेट कुलसुमबी यांच्या घरात पोहोचली. आपण शेजारच्या चाळीत राहत असून, बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याचे सांगत तिने घरात प्रवेश मिळवला.

आजार बरा करण्याच्या बहाण्याने दागिने काढून घेतले
घरात बसल्यानंतर संबंधित तरुणीने कुलसुमबी यांच्याशी संवाद साधला. त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगत, “मला मंत्रजपाच्या माध्यमातून आजारपण बरे करता येते,” असा दावा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर तिने मंत्रजप करण्याचे नाटक करत कुलसुमबी यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन्ही कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर घरातील तांदूळ आणून त्यावर दागिने ठेवले आणि काही मंत्र पुटपुटल्याचे नाटक केले. सर्व दागिने एका ओढणीत बांधून तिने ती कुलसुमबी यांच्याकडे ठेवली.

“दोन-तीन तासांत तुम्हाला आजारातून फरक जाणवेल. तोपर्यंत ही ओढणी उघडू नका. मी पुन्हा येते,” असे सांगून ती तरुणी घरातून निघून गेली.

अनेक तास उलटले, मात्र तरुणी परतलीच नाही
काही तास उलटूनही तरुणी परत न आल्याने कुलसुमबी यांनी ओढणी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना दागिने त्यात नसल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलसुमबी यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संबंधित तरुणीची ओळख पटवून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दागिन्यांची अंदाजे किंमत किती आहे, तसेच या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा