मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anti Corruption Trap Hadapsar : फेरफार नोंदीसाठी लाच मागणारा 'ठकसेन' गजाआड : हडपसर येथील कारवाईने महसूल विभागात खळबळ

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

anti corruption trap hadapsar

पुणे, दि. 15 जानेवारी : महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी) Anti Corruption Trap Hadapsar

पुणे महसूल विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. फुरसुंगी हडपसर येथील जमीनीबाबत फेर नोंदीकरिता तलाठ्यासाठी लाच मागणारा ‘ठकसेन' ॲण्टी करप्शनच्या कचाट्यात सापडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. Anti Corruption Trap Hadapsar

आरोपी खाजगी इसम ठकसेन उर्फ तुषार मारूती गलांडे, वय 42 वर्ष, रा.नारायण नगर, फुरसुंगी, हडपसर याच्याविरूद्ध लाच मागितल्या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Anti Corruption Trap Hadapsar

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार गट नं.309 सर्व्हे नं.138 मिळकतीसाठी फेरफार व सातबारा नोंदीसाठी पाठपुरावा करत होते. यावेळी फेर नोंदणीसाठी खाजगी इसम इसम ठकसेन उर्फ तुषार मारूती गलांडे यांनी तलाठी चौधरी यांच्यासाठी 10 हजार रूपयांच मागणी केली होती. याबबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.

आज दि.15 रोजी तलाठी कार्यालय फुरसुंगी येथे ठकसेन गलांडे यांना 5 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत अधिक तपास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.

हेही वाचा: Thane Drugs News : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तब्बल 42 किलो गांजा जप्त, चितळसर पोलिसांची कारवाई

शेअर करा