मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anjali Damniya : 'तुम्ही चांगले काम करता, पण परवानगी नाही!' पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन पाहणीसाठी गेलेल्या अंजली दमानियांना अडवले

Anjali Damania On Ajit Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; 'डायरेक्टर'चा उद्धटपणा, दमानियांचा अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anjali Damniya : 'तुम्ही चांगले काम करता, पण परवानगी नाही!' पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन पाहणीसाठी गेलेल्या अंजली दमानियांना अडवले

Anjali Damania On Ajit Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; 'डायरेक्टर'चा उद्धटपणा, दमानियांचा अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्या कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात गंभीर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज (18 नोव्हेंबर) प्रत्यक्ष ती वादग्रस्त जमीन पाहणी करण्यासाठी मुंढवा येथे पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांना गेटवरच अडवण्यात आले.

दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेटवर उपस्थित लोकांनी त्यांना 'तुम्ही चांगले काम करतात, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसणार, तोपर्यंत आत सोडता येणार नाही,' असे सांगितले. त्यांनी तेथील 'डायरेक्टर'चा नंबर घेऊन फोनवर संपर्क साधला, पण त्या व्यक्तीने अत्यंत उद्धटपणे बोलून पाहणीसाठी आत जाण्याची परवानगी स्पष्टपणे नाकारली. दमानिया यांनी आरोप केला की, "कोणाचे फोन आले, कोणी त्यांना परवानगी देऊ दिली नाही, मला माहिती नाही."

या पाहणीदरम्यान दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, "अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? अजित पवारांनी राजीनामा द्यावा." दमानिया यांनी या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना म्हटले की, "हा व्यवहार अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे देखील रद्द करू शकत नाहीत. कारण यात फसवणूक झाली आहे." जर हा व्यवहार रद्द केला, तर मी कोर्टात चॅलेंज करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दमानिया यांना तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती आणि 16 तारखेला इथे येऊन 'तमाशे' करणारे लोक कोण होते, याची चौकशी करायची होती. मात्र, आतमध्ये जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे 'केंद्र सरकारचा अधिकारी होता, त्याने माझ्यासोबत अत्यंत वाईट प्रकारे संवाद साधला,' असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

दमानिया यांना आतमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

शेअर करा