मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ameet Satam : “मुंबईत महायुतीचाच महापौर विराजमान होईल!”; अमित साटम यांनी स्पष्ट केली रणनीती; समाधान सरवणकरांच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया

Amit Satam On Mumbai BMC : फडणवीस दावोसला असले तरी शिंदेंच्या संपर्कात; महायुतीचे 118 नगरसेवक मिळून घेणार मुंबईच्या भविष्याचा निर्णय; सरवणकरांना मीडियासमोर न बोलण्याचा सल्ला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ameet Satam : “मुंबईत महायुतीचाच महापौर विराजमान होईल!”; अमित साटम यांनी स्पष्ट केली रणनीती; समाधान सरवणकरांच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया

Amit Satam On Mumbai BMC : फडणवीस दावोसला असले तरी शिंदेंच्या संपर्कात; महायुतीचे 118 नगरसेवक मिळून घेणार मुंबईच्या भविष्याचा निर्णय; सरवणकरांना मीडियासमोर न बोलण्याचा सल्ला

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत Mumbai BMC Election महायुतीला 118 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता महापौर कोणाचा होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात कोणतेही मतभेद नसून, महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले मिळून घेतील.

अमित साटम यांनी सांगितले की, "देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असले तरी, ते सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे महापौर आमचाच होणार यात शंका नाही. आमचे उद्दिष्ट केवळ सत्ता मिळवणे नसून मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सुरक्षितता देणे हे आहे. कोणाला कोणता अनुभव आहे आणि कोण कोणत्या समितीला न्याय देऊ शकेल, याचा सारासार विचार करूनच पदांचे वाटप केले जाईल."

समाधान सरवणकर यांच्या आरोपांवर उत्तर

प्रभादेवी-वरळीत भाजपच्या एका विशिष्ट गटाने (टोळीने) आपल्याला पाडण्याचे काम केले, असा गंभीर आरोप समाधान सरवणकर यांनी केला होता. त्यावर बोलताना साटम म्हणाले की, "समाधान सरवणकर यांनी भाजपवर नाही, तर काही विशिष्ट व्यक्तींवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या तक्रारीत किती सत्यता आहे, हे आम्ही त्यांच्याशी आणि इतरांशी चर्चा करून तपासून पाहू. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारी मीडियासमोर बोलण्याऐवजी आपापसात चर्चा करून सोडवणे जास्त योग्य असते. त्यांनी मीडियासमोर बोलणे टाळले पाहिजे होते."

जागावाटप आणि मुस्लिम बहुल भागातील पराभव

शिंदे गटाला मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्यामुळे त्यांचा पराभव झाला, या चर्चेवरही साटम यांनी भाष्य केले. "जागावाटपाची चर्चा अत्यंत सविस्तर झाली होती. कोणत्या वॉर्डात कोणत्या पक्षाचा संघटनात्मक प्रभाव आहे आणि जनभावना काय आहे, हे पाहूनच जागांचे वाटप करण्यात आले होते," असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा