मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambernath News : पप्पा, मला एक गेम खेळायचा आहे', वडिलांनी रागात हिसकावला फोन, मग 16 वर्षाच्या मुलाने उचलले हे भयानक पाऊल

Ambernath Breaking News : वडिलांनी फोन हिसकावून घेतल्याने संतापलेल्या 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ घडली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ambernath News : पप्पा, मला एक गेम खेळायचा आहे', वडिलांनी रागात हिसकावला फोन, मग 16 वर्षाच्या मुलाने उचलले हे भयानक पाऊल

Ambernath Breaking News : वडिलांनी फोन हिसकावून घेतल्याने संतापलेल्या 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ घडली आहे. मुलाने फोनचा वापर कमी करावा अशी कुटुंबाची इच्छा होती.

अंबरनाथ :- आजकाल मुलांना फोन वापरण्याचे खूप व्यसन लागले आहे, त्यामुळे जवळपास सर्वच पालक चिंताग्रस्त झाले आहेत.Ambernath Suicide News अशीच एक घटना ठाण्यातुन समोर आली असून, एका मुलाने मोबाईल हिसकावून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Ambernath Breaking News

वडिलांनी मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने आणि मोबाईल हिसकावून घेतल्याने संतप्त झालेल्या 16 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी अंबरनाथ शहरातील नेवाली गावातील एका चाळीत ही घटना घडली. दहावीचा विद्यार्थी अमन साहू याने कथितरित्या घराच्या छताला गळफास लावून घेतला जेव्हा त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरच्या पालकांची इच्छा होती की, त्याने अभ्यासात लक्ष केंद्रित करावे आणि फोन कमी वापरावा. त्याला अतिरिक्त वर्गात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की, मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे खूप व्यसन होते आणि घरातील सदस्यांना त्याला मोबाईल फोन वापरण्यापासून रोखायचे होते, त्यामुळे त्यांनी मुलाकडून मोबाईल हिसकावून घेतला. घरच्यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याने नैराश्येपोटी मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेअर करा