मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

आमदार काळेंच्या प्रयत्नातून अजय च्या कुटुंबियांना तात्काळ मदत

कळंब, प्रतिनिधी - दि.२८ तालुक्यातील भाटशिरपुरा येथील अजय आसाराम गायकवाड या तरूणांचा दिनांक 21/9/2024 रोजी शेतातील सोयाबीनची गंज झाकण्यासाठी गेले असता विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

आमदार काळेंच्या प्रयत्नातून अजय च्या कुटुंबियांना तात्काळ मदत

कळंब, प्रतिनिधी - दि.२८ तालुक्यातील भाटशिरपुरा येथील अजय आसाराम गायकवाड या तरूणांचा दिनांक 21/9/2024 रोजी शेतातील सोयाबीनची गंज झाकण्यासाठी गेले असता विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. घरातील तरुण मुलगा गेल्याने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत होती. आमदार विक्रम काळे यांनी तात्काळ कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि तेवढ्यावरच न थांबता वैयक्तिक प्रशासकीय पाठपुरावा करत आठ दिवसांत चार लाखांचा धनादेश त्याच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनीही त्वरित प्रशासकीय हालचाली केल्या असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. इतकी तात्काळ मदत पहीलयांदाच मिळाली असल्याने कुटुंबासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
धनादेश सुपूर्द करताना आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे,अंकुश नाडे, युवक जिल्हाउपाधयक्ष राहुल हौसलमल, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम चोंदे,कळंब शहराध्यक्ष दत्ता तनपुरे, उपाध्यक्ष गणेश भोसले, प्रकाश बावणे, अच्युतराव गायकवाड आदी उपस्थित होते.

शेअर करा