मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Akola News : दिल्लीहून परतताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अकोल्यात मोठा धक्का; जिल्हाप्रमुखासह 4 नगरसेवकांचा 'शिवसेनेत' प्रवेश

Akola Shivsena Eknath Shinde Member Joined Uddhav Thackeray Group : पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर राजकीय समीकरणांना वेग; अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Akola News : दिल्लीहून परतताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अकोल्यात मोठा धक्का; जिल्हाप्रमुखासह 4 नगरसेवकांचा 'शिवसेनेत' प्रवेश

Akola Shivsena Eknath Shinde Member Joined Uddhav Thackeray Group : पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर राजकीय समीकरणांना वेग; अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात

ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांची दिल्लीत भेट घेऊन मुंबईत परतताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अकोला महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे गटाच्या 6 पैकी चक्क 4 नगरसेवकांनी मंगळवारी मध्यरात्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून ठाकरे गटाला विदर्भात भगदाड पडले आहे.

नंदनवनवर मध्यरात्री रंगला राजकीय थरार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास दिल्लीहून ठाण्यातील आपल्या 'नंदनवन' निवासस्थानी परतले. याच वेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी तिथे दाखल झाले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी शिंदेंच्या उपस्थितीत हातावर 'शिवबंध' बांधले. विशेष म्हणजे, अकोला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही यावेळी शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रवेश केलेले प्रमुख चेहरे

अकोला महानगरपालिकेत आता ठाकरे गटाचे अवघे दोन नगरसेवक उरले आहेत. शिंदे गटात सामील झालेल्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे.

मंगेश काळे (जिल्हाप्रमुख, उबाठा)

सुरेखा काळे (नगरसेविका - महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार होत्या)

मनोज पाटील (नगरसेवक)

सागर भारुका (नगरसेवक)

सोनाली सरोदे (नगरसेविका)

वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर महापौर पदाची निवडणूक लढवलेल्या सुरेखा काळे यांनीच पक्ष सोडल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा नैतिक पराभव मानला जात आहे.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोप

एककीकडे अकोल्यात फोडाफोडी सुरू असतानाच, सातारा जिल्ह्यातही शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी छुप्या पद्धतीने हातमिळवणी करून जावळीच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा दावा कदम यांनी केला आहे.

शेअर करा