मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar: मैदानावरही शोककळा! अजितदादांच्या निधनाने सचिन तेंडुलकरसह क्रिकेट विश्व हळहळले

Sachin Tendulkar On Ajit Pawar : "महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला"; अजिंक्य रहाणे, युसूफ पठाण आणि अझरुद्दीन यांनी वाहिली श्रद्धांजली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar: मैदानावरही शोककळा! अजितदादांच्या निधनाने सचिन तेंडुलकरसह क्रिकेट विश्व हळहळले

Sachin Tendulkar On Ajit Pawar : "महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला"; अजिंक्य रहाणे, युसूफ पठाण आणि अझरुद्दीन यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील 'पॉवर प्ले' ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण होता, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे पडसाद आता क्रीडा जगतातही उमटले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांचा अंत झाल्याची बातमी समजताच क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने अजित पवारांना 'कष्टाळू नेता' संबोधत आपली श्रद्धांजली अर्पण केली.

सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट

नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अजितदादांच्या जाण्याने सचिन तेंडुलकर व्यथित झाला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले:
"महाराष्ट्राने आज एक महान आणि कष्टाळू नेता गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."

अजिंक्य रहाणेकडून 'दादां'ना मानवंदना

भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने देखील दादांच्या जाण्याने मोठे दुःख झाल्याचे सांगितले. "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप वेदना झाल्या आहेत. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत," असे अजिंक्यने नमूद केले.

युसूफ पठाण आणि अझरुद्दीन यांनी जागवल्या आठवणी

माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांनी अजितदादांना एक 'मेहनती नेता' म्हणून ओळखले. "विमान अपघातात त्यांच्या निधनाची बातमी हृदयद्रावक आहे," अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनीही अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत, देशाने एक अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली.

शेअर करा