मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : 'अमेडिया' जमीन विक्री प्रकरण: अजित पवारांनी खापर फोडले अधिकाऱ्यांवर!

Ajit Pawar On Pune Land Scam : "अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली असती, तर प्रकार घडला नसता," पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीच्या व्यवहारावर उपमुख्यमंत्र्यांचे विधान; प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवानी अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar : 'अमेडिया' जमीन विक्री प्रकरण: अजित पवारांनी खापर फोडले अधिकाऱ्यांवर!

Ajit Pawar On Pune Land Scam : "अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली असती, तर प्रकार घडला नसता," पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीच्या व्यवहारावर उपमुख्यमंत्र्यांचे विधान; प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवानी अटकेत

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानीला अटक केली आहे. याशिवाय तहसीलदार सूर्यकांत येवले आणि 'अमेडिया' कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर कारवाई न झाल्याने विरोधकांनी टीका केली असतानाच, अजित पवार यांनी या जमीन व्यवहार प्रकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

अजित पवारांचे विधान

शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाचे एक विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकात आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील तक्रारी कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत. हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी आणले का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले

"या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता."
या विधानामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून येत आहे.

कारवाई आणि गुन्हे

'अमेडिया' कंपनीच्या जमीन विक्री प्रकरणात प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर तहसीलदार सूर्यकांत येवले आणि कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा