मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द; समर्थकांचा हिरमोड

Pune Ajit Pawar Ganpati Visit Canceled : गणेश मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम शेवटच्या क्षणी स्थगित, पुणे सोडून मुंबईकडे रवाना

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP List of Maharashtra Assembly Election

Pune Ajit Pawar Ganpati Visit Canceled : गणेश मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम शेवटच्या क्षणी स्थगित, पुणे सोडून मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवड :- उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा आजचा पिंपरी-चिंचवड दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांच्या समर्थकांचा मोठा हिरमोड झाला आहे. शहरातील जवळपास 40 गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता, मात्र अचानकपणे ते मुंबईला रवाना झाले.

अजित पवार दुपारी 12.30 वाजता शहरात येणार होते, पण पावणे दोन वाजता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. "काही कारणास्तव दादांचा दौरा रद्द झाला आहे. शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला आहे," असे त्यांनी सांगितले.

अजित पवारांच्या स्वागतासाठी शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी जय्यत तयारी केली होती. मंडपाची सजावट, बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, दौरा रद्द झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. "दोन दिवसांपासून आम्ही स्वागताची तयारी करत होतो, पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याने निराशा झाली," अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पुढील निवडणुका लक्षात घेऊन काही कार्यकर्त्यांनी या दौऱ्यातून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची तयारीही केली होती. मात्र, दौरा रद्द झाल्याने त्यांचेही प्रयत्न फोल ठरले. अजित पवारांनी दौरा अचानक का रद्द केला, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही, पण या निर्णयामुळे शहरातील गणेश मंडळांचा उत्साह थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा