मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : अजित पवारांचे अखेर स्पष्टीकरण; ‘महिला अधिकाऱ्याला दम दिला नाही, परिस्थिती शांत ठेवण्यासाठी बोललो’

Ajit Pawar On Solapur Lady Officer Viral Video Call : व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर; कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता, उपमुख्यमंत्री म्हणतात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar : अजित पवारांचे अखेर स्पष्टीकरण; ‘महिला अधिकाऱ्याला दम दिला नाही, परिस्थिती शांत ठेवण्यासाठी बोललो’

Ajit Pawar On Solapur Lady Officer Viral Video Call : व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर; कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता, उपमुख्यमंत्री म्हणतात

पुणे :- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दम दिल्याचा व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. अखेर आता अजित पवार यांनी यावर मौन सोडत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ (X) हँडलवर एक पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. "मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता," असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता."

आपल्या पोलीस दलाबद्दल आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल आपल्याला सर्वोच्च आदर असल्याचे त्यांनी सांगितले. "माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकरण काय होते?

सोलापुरातील माढा येथे मुरुमाच्या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी अंजना कृष्णा गेल्या होत्या. त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना फोन केला. त्या फोनवरून अजित पवार यांनी अधिकाऱ्याला, "मी उपमुख्यमंत्री बोलतोय, मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा," असे सांगितले.

अधिकाऱ्याने आपल्या फोनवर थेट कॉल न केल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा अजित पवार संतापले. "तुमची एवढी हिंमत झाली का?" असे म्हणत त्यांनी थेट व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद शांत होण्याची शक्यता आहे.

शेअर करा