मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Air India Plane Crash Ahmedabad : दुर्घटनेच्या ढगांतही आशेचा किरण…बदलापूरचे दीपक पाठक विमान अपघातात होते केबिनक्रु

Air India Plane Crash Ahmedabad : "फोन वाजतोय… पण उचलत नाही," — कुटुंब अजूनही आशावादी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Air India Plane Crash Ahmedabad : दुर्घटनेच्या ढगांतही आशेचा किरण…बदलापूरचे दीपक पाठक विमान अपघातात होते केबिनक्रु

Air India Plane Crash Ahmedabad : "फोन वाजतोय… पण उचलत नाही," — कुटुंब अजूनही आशावादी

बदलापूर | अहमदाबादहून लंडनकडे झेपावणाऱ्या विमानाच्या भीषण दुर्घटनेने देशाला हादरवून टाकले असतानाच बदलापूर येथील दीपक पाठक या सहवैमानिकाचे नाव समोर येताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दीपक यांचा मोबाईल अजूनही सुरू असल्याने त्यांच्या परिवारात आशेचा किरण कायम आहे.गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडिया कंपनीचे विमान कोसळले. या अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात दीपक पाठक हे सहवैमानिक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती समोर येताच त्यांचे कुटुंबीय सुन्न झाले. माध्यमांशी बोलताना त्यांची भावना अगदी स्पष्टपणे व्यक्त झाली — "आमचा दीपक अजूनही आमच्यात आहे, याची आम्हाला आशा आहे. त्याचा फोन वाजतोय… रिंग जातेय… पण उचलला जात नाही. तो जिवंत आहे असंच आम्ही मानतोय. जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही."

दीपक गेली अकरा वर्षं एअर इंडियामध्ये कार्यरत असून प्रत्येक वेळेस घरी फोन करूनच तो प्रवासाला निघतो, असेही त्यांच्या घरच्यांनी सांगितले. "आजही त्याचा कॉल आला होता… त्यामुळे आम्ही अजूनही ताणलेलं श्वास रोखून, एका सकारात्मक बातमीची वाट पाहत आहोत."

शेअर करा