मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aditya Thackeray : 'आज परत कोणीतरी गावी जाणार'! शिंदेसेनेच्या बहिष्कारावरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना थेट डिवचला

Aditya Thackeray On Shinde Group : 'चोर मचाये शोर'!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray

Aditya Thackeray On Shinde Group : 'चोर मचाये शोर'! फडणवीसांनीही शिंदेसेनेच्या मंत्र्यांना सुनावले; 'तुम्ही करणार असाल, तर आम्हीही करू'

मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून, आज शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने हे मंत्री नाराज आहेत. या नाराजीवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.

आदित्य ठाकरेंचा जहरी टोला

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले,"असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!"

आदित्य ठाकरे यांनी या बहिष्काराला "महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान" असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी शेवटी 'चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…' असा सूचक टोला लगावत शिंदे गटावर निशाणा साधला.

भाजपचाही शिंदेसेनेला 'खडे बोल'

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी डोंबिवलीतील प्रवेशांवर नाराजी व्यक्त केली असता, फडणवीस यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले असल्याची माहिती समोर येत आहे.

फडणवीस म्हणाले, "उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे." गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले या मंत्र्यांना फडणवीसांनी हे 'खडे बोल' सुनावले.

याचवेळी, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही ट्विट करत, "भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती. आता फक्त ती मोडून खायला भाजपने सुरू केली आहे, एवढंच!" अशी बोचरी टीका केली आहे.फडणवीस आणि आदित्य ठाकरे या दोघांच्याही प्रतिक्रियेनंतर शिंदे गटाकडून काय उत्तर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा