मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ACB Trap Ravet | रावेत : लाचखोर पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच | ACB Trap Ravet

M
mubarak

1 मिनिट वाचन

acb trap ravet

  • कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच | ACB Trap Ravet
  • पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
    महाराष्ट्र मिरर

    ACB Trap Ravet | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील PCPC रावेत Ravet पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ANTI-CORRUPTION BUREAU OF MAHARASHTRA कचाट्यात सापडला आहे.

    आरोपी लोकसेवक ज्ञानदेव तुकाराम बागडे, पोलीस हवालदार, रावेत पोलीस ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    दि. ११ रोजी हॊटेल गंधर्व शेजारी, पुनवळे याठिकाणी सापळा कारवाई करण्यात आली.

    तक्रारदार व्यापारी असून, तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एक मोटार सायकलस्वार यांचा पुनवळे येथे अपघात झाला होता. त्याबाबत एम.एल.सी. होवून लोकसेवक पो. हवा. ज्ञानदेव बगाडे यानी सदर अपघात प्रकरणी जबाब नोंदवून आपसात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक ज्ञानदेव बगाडे यांनी तक्रारदार यांचेकडे ५,०००/- लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक ज्ञानदेव बगाडे यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, ५,०००/- (पाच हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता लोकसेवक ज्ञानदेव बगाडे याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध रावेत पोलीस स्टेशन,पिंपरी-चिंचवड, पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विजय पवार तपास करत आहेत.

    सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

    हेही वाचा: Pune Police PI Transfer | मोठी बातमी : काळेपडल, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, खराडी, आंबेगाव, नांदेडसिटी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

    शेअर करा