मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ACB Trap News : "सरकारी मदतीचा सौदा" – लाचखोर लिपिक ACB च्या सापळ्यात गटांगी; मृत होमगार्डच्या मुलीकडून 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ACB Trap News : सरकारी कर्मचाऱ्याचा अमानुष चेहरा उघड; फोन पे वर पैसे घेताच सापळा कार्यवाही, मोबाईलसह अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

ACB Trap News : "सरकारी मदतीचा सौदा" – लाचखोर लिपिक ACB च्या सापळ्यात गटांगी; मृत होमगार्डच्या मुलीकडून 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ACB Trap News : सरकारी कर्मचाऱ्याचा अमानुष चेहरा उघड; फोन पे वर पैसे घेताच सापळा कार्यवाही, मोबाईलसह अटक

छत्रपती संभाजीनगर | "वडिलांचे जाणे दुखःद होते… पण सरकारी मदतीसाठी लाच मागितली जाते, हे अधिक वेदनादायक!"मृत होमगार्डच्या 24 वर्षीय मुलीने जेव्हा वडिलांच्या उपचार खर्चाची आणि सानुग्रह अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी अर्ज केला, तेव्हा कार्यालयातील लिपिकाने सरळपणे सांगितले – “20 हजार द्या, फाईल पुढे जाईल.”या अमानुष आणि क्रूर वर्तनाचा पर्दाफाश करत ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ने एक धाडसी सापळा रचला आणि होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिक सोपान पंडितराव टेपले (वय 41) याला 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. Chatrapati Sambhaji Nagar Latest Bribe News

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील लिपिकाकडून सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी लाचेची मागणी

2 जुलै 2025 रोजी ACB ला तक्रार मिळाली. तक्रारदार महिला वडिलांच्या मृत्यूपश्चात मदतीसाठी अर्ज करत होत्या. टेपले यांनी त्यांच्या वडिलांच्या फाईलवर मंजुरी मिळवण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर रक्कम 15 हजारांवर आली आणि ती फोन पे द्वारे पाठवण्याचे सांगण्यात आले.3 जुलै 2025 रोजी सकाळीच तक्रारदार महिलेने फोन पे वरून 15,000 रुपये पाठवले. टेपलेने मोबाईलवर पैसे आल्याची खात्री देताच, ACB च्या पथकाने त्यांच्या N-12 होमगार्ड कार्यालयात छापा टाकून त्याला अटक केली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून रेडमी कंपनीचा मोबाईल, कॅनरा व HDFC बँकेची एटीएम कार्डे व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या घराची झडती सुरू असून, पुढील तपासासाठी मोबाईलची तपासणी करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक) माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजू नांगलोत व सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांनी केली. पथकात राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर व सी. एन. बागुल यांचा समावेश होता.

शेअर करा