मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ACB Trap News : 75 वर्षीय शाळेतील सचिवाला तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक; एसीबीची मोठी कारवाई

ACB Arrested School Sachiv For Taking Bribe : सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजी नगर शाळेच्या सचिवाने पगार चालू करण्यासाठी अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या तक्रारदाराकडून मागितली तीन लाख रुपयांची लाच

V
Vivek

1 मिनिट वाचन

ACB Trap News: “A deal of ten thousand… and a village servant in the trap!”

ACB Arrested School Sachiv For Taking Bribe : सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजी नगर शाळेच्या सचिवाने पगार चालू करण्यासाठी अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या तक्रारदाराकडून मागितली तीन लाख रुपयांची लाच

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजी नगर मधील प्रसिद्ध शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सेंट फ्रान्सिस डीसेल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर येथील या संस्थेच्या सचिवाने अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी 75 वर्षीय सचिवाला एसीबीने ताब्यात घेतले आहे. ACB Bribe Trap फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाना असे सचिवाचे नाव असून त्यांना एसीबीने तीन लाख रुपयांची लाच 3 Lakh Bribe स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर संस्थेच्या शाळेत नोकरीस लागलेले आहेत.त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरिता तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. आज (12 डिसेंबर) रोजी फादर विल्फ्रेड यांनी पंच साक्षीदारा समक्ष लाच रक्कम सचिव कार्यालयात, भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल, गंगापूर, येथे स्वीकारत असता त्यांना ताब्यात घेण्यात आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

acb sp sandeep aatole

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक
ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सापळा सहाय्यक अधिकारी विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर सापळा पथक - पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, जीवडे , सी एन बागुल ला. प्र. वि. यांनी कारवाई करत सचिवाला ताब्यात घेतले आहे.

शेअर करा