मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : "काळजी घे संजय काका!" प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात आदित्य ठाकरेंचा संजय राऊतांना भावनिक सल्ला

Aaditya Thackeray On Sanjay Raut : 'प्रत्येक संकटातून जिंकतोस', आदित्य ठाकरेंच्या पोस्टला राऊतांचे 'माय डियर आदित्य' म्हणत प्रत्युत्तर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray On Sanjay Raut : 'प्रत्येक संकटातून जिंकतोस', आदित्य ठाकरेंच्या पोस्टला राऊतांचे 'माय डियर आदित्य' म्हणत प्रत्युत्तर

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी तब्बल दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या Mumbai BMC Election तोंडावर राऊतांनी घेतलेल्या या ब्रेकमुळे ठाकरे गट चिंतेत असताना, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांना भावनिक संदेश दिला आहे.

आदित्य ठाकरेंचा संदेश

संजय राऊत यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करताना आदित्य ठाकरे यांनी 'संजय काका' या शब्दांत प्रेम व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले:

"काळजी घे संजय काका. प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, खात्री आहे."

आदित्य यांच्या या भावनिक पोस्टला संजय राऊत यांनीही त्वरित प्रत्युत्तर दिले. "धन्यवाद, माय डियर आदित्य," असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनीही केली होती चौकशी

उल्लेखनीय आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (गुरुवारी) एका पोस्टद्वारे संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली होती. मोदी म्हणाले होते: "संजय राऊत जी, लवकरात लवकर बरे व्हा. मी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो."

यावर राऊत यांनीही त्यांचे आभार मानले होते: "आदरणीय पंतप्रधान धन्यवाद. माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र." राजकीय मतभेद असूनही नेतेमंडळींनी घेतलेल्या या माणुसकीच्या भूमिकेचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

शेअर करा