मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर गंभीर आरोप

खोके द्या, तरच बदली करतो, आदित्य ठाकरे यांचा आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray : महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर गंभीर आरोप

  • खोके द्या, तरच बदली करतो, आदित्य ठाकरे यांचा आरोप
  • मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्यात चालू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, मात्र ते धाब्यावर बसवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केवळ 'खोक्यां' साठी बदल्या रखडवून ठेवल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. Aaditya Thackeray

    यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल व अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. चहल व अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या रुटिन बदल्या ओव्हरडयू होऊनही केल्या जात नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray

    मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासकांना असे निर्देश दिले आहेत की, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठमोठी कामे मंजूर करून घ्या आणि इतके इतके खोके आम्हाला द्या, तरच तुमच्या बदल्या होणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray

    शेअर करा