मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : "घुसखोर आलेच कसे? हे तर राष्ट्रीय सुरक्षेचं अपयश!"; बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार

Aaditya Thackeray On Illegal Bangladeshi People : मुंबईच्या मूळ प्रश्नांकडे वेधलं लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray On Illegal Bangladeshi People : मुंबईच्या मूळ प्रश्नांकडे वेधलं लक्ष

मुंबई :- मुंबईतील नागरी समस्या प्रलंबित असताना सरकारचं आणि महापौरांचं लक्ष केवळ बांगलादेशी घुसखोरीवर केंद्रित असल्याबद्दल आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून भाजपला काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. मुंबईत सध्या खड्डे, कचरा व्यवस्थापन, अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ आणि वाढतं प्रदूषण हे गंभीर प्रश्न आहेत. या प्रश्नांवर काम करण्याऐवजी घुसखोरीच्या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

आदित्य ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौर यांच्या वर निशाणा साधताना विचारलं की, "नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…

बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!

भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत:

जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?

ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले?

इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे!

ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश?
उत्तर एकच, भाजप!
जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे!

जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले?

ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!

शेअर करा