मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

वाघोलीत तरुणाला सव्वा पाच लाखांचा गंडा

ऑनलाईन 'टास्क’च्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

वाघोलीत तरुणाला सव्वा पाच लाखांचा गंडा

ऑनलाईन 'टास्क’च्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

पुणे: मोबाईलच्या साहाय्याने घरबसल्या ऑनलाईन ‘टास्क’ पूर्ण करून जादा परतावा (रिटर्न्स) देण्याचे आमिष दाखवून वाघोलीतील एका ४२ वर्षीय तरुणाची ५ लाख १२ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर भामट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

याबाबत वाघोली परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय पीडित व्यक्तीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित मोबाईल क्रमांक धारक, लिंक पाठवणारे आणि ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यात आले त्या बँक खाते धारकांसह वापरकर्त्यांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही ऑनलाईन फसवणूक ५ जानेवारी २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी घडली.

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे जाळ्यात ओढले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादी तरुणाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जोडले (ॲड केले). त्यानंतर त्या ग्रुपवर घरबसल्या विविध ऑनलाईन कामे आणि टास्क पूर्ण करून घरच्या घरी हजारो रुपये कमावण्याच्या खोट्या जाहिराती पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला किरकोळ टास्क देऊन त्यांना चांगला परतावाही देण्यात आला.

व्हीआयपी टास्क आणि मोठ्या नफ्याचे आमिष
फिर्यादीचा पूर्ण विश्वास बसल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना व्हीआयपी टास्क आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. आरोपींनी वेळोवेळी विविध लिंक्स पाठवून फिर्यादीकडून तब्बल ५ लाख १२ हजार ८०० रुपये ट्रान्सफर (वर्ग) करून घेतले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या हक्काच्या पैशांची आणि नफ्याची मागणी केली असता, चोरट्यांनी अधिक पैशांची मागणी करत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वाघोली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी क्रमांकावरून येणारे व्हॉट्सॲप संदेश किंवा टेलिग्राम चॅनेलवरील ऑनलाईन टास्कच्या ऑफर्सला बळी पडू नये.
वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा