मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा वर्धापनदिन सोमवारी

पुण्यातील रंगकर्मीना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पुण्यातील रंगकर्मीना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार

निलेश राऊत
पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा ४८ वा वर्धापनदिन सोमवारी (दि. २५) पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात साजरा होणार आहे. यानिमित्त परिषदेच्या वतीने पुण्यातील रंगकर्मीना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना 'आठवणीतला लक्ष्या' या विशेष कार्यक्रमातून अभिवादन करण्यात येणार आहे', अशी माहिती शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शाखेच्या उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अशोक जाधव, जतीन पांडे, चेतन चावडा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, अभिनेत्री प्रिया बेर्डे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, सूर्यदत्ताचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारांचे मानकरी
विराजस कुलकर्णी (मनोरमा नातू पुरस्कृत उत्कृष्ट नाट्यलेखन), राज कुबेर (पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पारितोषिक उत्कृष्ट व्यावसायिक नाट्यदिग्दर्शन), स्वप्नील कुलकर्णी (गो. रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक), निरंजन कुलकर्णी (स्वरराज छोटा गंधर्व स्मृती), ओंकार खाडिलकर (वसंतराव देशपांडे स्मृती), मयूर डागळे (डॉ. अ. द. जोशी स्मृती), विश्वास पांगारकर (गंगाधरपंत लोंढे पुरस्कार), आनंद जोशी (वसंत शिंदे पुरस्कार), दत्तात्रय गाडेकर (नेपथ्यकार पु. श्री. काळे स्मृती), पुष्कर श्रोत्री (नटवर्य केशवराव दाते स्मृती), सुनीता गुणे (माणिक वर्मा स्मृती), वसंत भडके (बबनराव गोखले अखंड नाट्यसेवा), प्रदीपकुमार कांबळे (भार्गवराम आचरेकर स्मृती), सुशील भोसले (यशवंत दत्त पुरस्कार), दिलीप वाघमारे (मधू कडू पुरस्कार), राहुल भालेराव (मधुकर टिल्लू पुरस्कार), आशा मुसळे (यमुनाबाई वाईकर स्मृती), हेमांगी काळे-गरूड (राजाबाळ शंकरराव अलोणी स्मृती आणि इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी अभिनेत्री), दशरथ पाचरणे (राम नगरकर स्मृती), अक्षया देवधर (सुनील तारे पुरस्कार) आणि सावनी दातार-कुलकर्णी (उदयन काळे स्मृती पुरस्कार).

शेअर करा