मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्वहृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

Vinod Pawar : कुर्ल्यातील माकडवाला कंपाउंडमध्ये पोलिसांची मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन; विनोद पवार हत्या प्रकरणी तिघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

• Vinod Pawar Murder Case Update : 25 ते 30 घरांची झडती घेत तलवारी, कोयते, मॅचेटी व चाकू जप्त; विनोबा भावे नगर पोलिसांत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Vinod Pawar Murder Case Update

मुंबई :- कुर्ला पश्चिमेकडील माकडवाला कंपाउंड परिसरात विनोद पवार यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री विशेष शोधमोहीम राबवली. या धडक मोहिमेत हत्या प्रकरणातील आणखी तिघांना अटक करण्यात आली असून, परिसरातील 25 ते 30 घरांची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या शस्त्रसाठ्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

हत्येची पार्श्वभूमी आणि शोधमोहिमेची तयारी

माकडवाला कंपाउंड परिसरातील विविध कुटुंबांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वावरून वाद सुरू आहेत. या वादांतून यापूर्वीही हाणामारी व हत्येच्या घटना घडल्या आहेत. याच वादातून 11 नोव्हेंबर रोजी विनोद मल्लप्पा पवार (वय 40) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक केली होती. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही विशेष शोधमोहीम राबवली.

150 पोलिसांचा फौजफाटा आणि शस्त्रसाठा जप्त ; परिमंडळ 7 मधील 10 पथकांद्वारे रात्री घेराव; एका गुन्ह्यात महिलेचाही समावेश, सराईत गुन्हेगार ताब्यात

या मोहिमेसाठी परिमंडळ 7 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या मदतीने 10 पथके तयार करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पासलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी या शोधमोहिमेत सहभागी झाले होते.

गुरुवारी मध्यरात्री संपूर्ण माकडवाला कंपाउंड परिसराला घेराव घालून पोलिसांनी घरांची झडती घेतली. या झडतीत तलवारी, कोयते, मॅचेटी आणि चाकू आदी शस्त्रे आढळून आली. जप्त शस्त्रांप्रकरणी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका गुन्ह्यात एका महिलेचाही समावेश आहे. तसेच परिसरातील काही सराईत गुन्हेगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

शेअर करा