मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
‘नको घड्याळ, नको तुतारी’; राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यास रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका?धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकीकेवळ घराच्या क्षेत्रफळापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्व

Sanjay Raut : डीलिमिटेशन बिलाच्या पाठिंब्यासाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, अमित शाहांवरही निशाणा

• दोन दिवसांत रक्कम 100 कोटींवरून 150 कोटींवर गेल्याचा आरोप; महाराष्ट्रातील पुढाऱ्यांवर जबाबदारी सोपवल्याचे विधान

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Sanajy Raut Speaks On Delimitation Bill

छत्रपती संभाजीनगर :- केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा आणले जाणारे ‘डीलिमिटेशन बिल’ (Delimitation Bill) मंजूर करून घेण्यासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) केला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना राऊत यांनी हा आरोप केला असून, दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“होलसेलमध्ये खासदारांना आपल्याकडे ओढले जात आहे”; जुळवाजुळवीसाठीच अधिवेशनाबाबत चालढकल असल्याचा आरोप

संभाजीनगरमध्ये संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “केंद्र सरकार पुन्हा एकदा डीलिमिटेशन बिल आणणार आहे. त्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली असून काही राजकीय पक्षांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावला आहे. होलसेलमध्ये खासदारांना आपल्याकडे ओढले जात आहे. त्यामुळेच संसदेचे अधिवेशन घेतले जात नाही आणि खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तर माझा हा आकडा लक्षात ठेवा; दोन दिवसांत 100 कोटींवरून 150 कोटींचा आकडा झाला आहे.”

“हा पॉलिटिकल नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव”; मुंबईतून पैसा जाणार असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यांवरूनही राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, “अमित शाह किती वेळा मुंबईत आले? ते वारंवार मुंबईत का येतात? काय व्यवहार चालले आहेत? खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा पैसा मुंबईतून जाणार असून याची जबाबदारी मुंबई व महाराष्ट्रातील काही प्रमुख पुढाऱ्यांवर देण्यात आली आहे.”

जुन्या घटनांचा संदर्भ देत राऊत यांनी पुढे म्हटले की, “पाच वर्षांपूर्वी 50 कोटींना आमदार आणि 75 कोटींना खासदार विकला गेला होता. त्यामुळे 150 कोटी ही सन्मानीय रक्कम आहे. आमचे सहा खासदार गेले होते, ते प्रत्येकी 80 कोटींना विकले गेले; मात्र निवडून आल्यावर त्यांना 15 कोटी आधीच मिळाले होते, हे एकनाथ शिंदेंचे डील होते. आताचा भाव हा राष्ट्रीय भाव आहे; जसा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव असतो, तसा हा ‘पॉलिटिकल नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चा भाव आहे,” असा चिमटाही त्यांनी काढला.

शेअर करा