मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

चिखलीत ज्वेलरीच्या दुकानातून पैंजण चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

५० हजार रुपये किमतीचे १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन पैंजण चोरण्याचा प्रयत्न

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

चिखलीत ज्वेलरीच्या दुकानातून पैंजण चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

५० हजार रुपये किमतीचे १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन पैंजण चोरण्याचा प्रयत्न

पिंपरी: दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन चांदीचे पैंजण चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी (२० मे) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, शिवाजी चौक, चिखली येथे घडली.

पोलिसांनी निलाबाई बाबू शिंदे (५५), फुलाबाई भानुदास ढोकळे (६०) आणि इंदाबाई दिलीप ढोकळे (६०, तिघीही रा. नागेवाडी, जि. जालना) यांना अटक केली आहे. या प्रकरणी सुनील जवाहरलाल पवार (३२, चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी चिखली येथील बालाजी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानातील ५० हजार रुपये किमतीचे १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन पैंजण चोरण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला आणि महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा