मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

२,४०० किलो गांजाची पुण्यात विल्हेवाट

नाशिकमध्ये जप्त केलेला ४८.३६ लाख रुपयांचा २,४०० किलो गांजा पुण्यात नष्ट; राज्य पोलिसांची धडक कारवाई

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

२,४०० किलो गांजाची पुण्यात विल्हेवाट

नाशिकमध्ये जप्त केलेला ४८.३६ लाख रुपयांचा २,४०० किलो गांजा पुण्यात नष्ट; राज्य पोलिसांची धडक कारवाई

पुणे: अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राज्य शासनाने स्वीकारलेल्या ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) धोरणाचा भाग म्हणून, महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने शुक्रवारी (ता. २२) एका मोठ्या कारवाईत जप्त केलेला तब्बल २,४०० किलोग्रॅम (२.४ टन) गांजा यशस्वीरीत्या नष्ट केला.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे ४८ लाख ३६ हजार रुपये इतकी होती. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ (एमईपीएल) च्या केंद्रात सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून हा साठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला.

१६ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल
हा अंमली पदार्थांचा साठा नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०३६/२०१० मधील धडक कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला होता. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया आणि विल्हेवाटीबाबतच्या कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करत, विहित मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे एका ‘उच्चस्तरीय अंमली पदार्थ विल्हेवाट समितीची’ (एचएलडीडीसी) स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि संबंधित पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त यांचा समावेश होता.

समितीच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पडताळणी
गांजा नष्ट करण्याच्या या मोहिमेपूर्वी उच्चस्तरीय अंमली पदार्थ विल्हेवाट समितीने विल्हेवाटीच्या प्रस्तावाचे अत्यंत बारकाईने पुनरावलोकन केले. समितीने न्यायालयीन दस्तऐवज, गुन्ह्याची नोंद आणि प्रत्यक्ष मुद्देमालाचे अचूक वजन या सर्व बाबींची पडताळणी करून संपूर्ण पारदर्शकता निश्चित केली. सर्व वैधानिक बाबींची पूर्तता झाल्यावर समितीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली रांजणगाव येथे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली.

पर्यावरणाची घेतली दक्षता
अंमली पदार्थांची विल्हेवाट लावताना केंद्रीय पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांचे आणि घातक कचरा व्यवस्थापन नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात आले. ज्यामुळे पर्यावरणात कोणताही घातक वायू किंवा प्रवाह सोडला जाणार नाही (झिरो हेझार्डस डिस्चार्ज) याची विशेष काळजी घेण्यात आली.

या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली मोहीम
ही संपूर्ण प्रक्रिया अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडी) सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) श्रीमती ज्योती प्रिया सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) प्रवीणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक (एसपी) अनुज तारे, आणि नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या राज्य पोलिसांच्या निर्धाराला अधिक बळ मिळाले आहे.

शेअर करा